Ad will apear here
Next
२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन
लायन्स क्लबतर्फे ‘प्रदूषणविरहित गणेशविसर्जन’ उपक्रम

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आर्जवाबरोबरच त्याचे विसर्जन प्रदूषणविरहित व्हावे, यासाठी लायन्स क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘प्रदूषणविरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात छोट्या-मोठ्या मिळून एकूण २२०० गणेशमूर्ती व साडेसात टन निर्माल्य संकलित करण्यात आले. 

‘पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३२ लायन्स क्लब एकत्रित आले व त्यांनी गणेशभक्तांना मूर्ती विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशभक्तांनी मूर्तींचे दान केले. तब्बल २२०० मूर्ती आणि साडेसात टन निर्माल्य संकलित करण्यात आले,’ अशी माहिती लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या जलप्रदूषण विभागाचे जिल्हाध्यक्ष लायन किशोर मोहोळकर यांनी दिली.

किशोर मोहोळकर म्हणाले, ‘प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील भिडे पूल, राजाराम पूल, निलायम टॉकीज, नटेश्वर विविध घाटांवर ३२ क्लबमधील साधारणपणे तीन हजार सदस्यांनी, विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या उपक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री यांच्या हस्ते झाले. या वेळी सागर भोईटे, अनिल मंद्रुपकर, योगेश कदम यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरच्या घरी मूर्ती विसर्जन करण्यासह मूर्तीदानाचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचे (खाण्याचा सोडा) वाटप केले. त्यात दोन हजारपेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जनानंतर ही पावडर हौदात टाकण्यात आली. गुरुवारी, १२ तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत २२०० मूर्ती संकलित केल्या असून, त्या सर्व मूर्ती म्हाळुंगे येथील श्री फाउंडेशनला, तर संकलित निर्माल्य कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी पाठवण्यात आले.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZWBCE
Similar Posts
प्रदूषणविरहित गणपती विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब्स’चा पुढाकार पुणे : ‘दहा दिवस आनंदाने आपल्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याचे विसर्जन प्रदूषणविरहित व्हावे, यासाठी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी दोन या संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गणपती विसर्जन काळात (दि. ११ व १२ सप्टेंबर २०१९) ‘प्रदूषण विरहित
‘‘लायन्स क्लब’मुळे पोलिसांना घरच्या जेवणाचा आस्वाद’ पुणे : ‘गणेश विसर्जन काळात अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लायन्स क्लबतर्फे उभारलेल्या या श्रमपरिहार केंद्रामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्यासारखे ताजे आणि पौष्टिक जेवण मिळाले
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे ‘अपसाउथ’मध्ये प्रदर्शन पुणे : पाण्यात सहजपणे विरघळणाऱ्या माती, तुरटी, गायीचे शेण, पंचगव्य यापासून बनलेल्या; कोणताही रंग न दिलेल्या निव्वळ मातीच्या, तसेच नैसर्गिक रंगांमध्ये रंगवलेल्या आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन वाकड येथील अपसाउथ हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
शाळेतील मुले घडवताहेत शाडूच्या गणेशमूर्ती पुणे/पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा घरी केली जावी, असे आवाहन पालिकेतर्फे पालकांना करण्यात येत आहे. यातून पर्यावरणपूरक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language